Share

चौथा कसोटी सामना कोणाच्या पारड्यात ? भारत विजयापासून केवळ ४ बळी दूर

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे सुरु असलेला चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य मिळाले. खेळाच्या चौथ्या दिवशी, इंग्लंड संघाने त्यांच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या सर्वोत्तम सुरुवातीच्या आधारावर कोणतेही नुकसान न करता 77 धावा केल्या होत्या.

आजचा म्हणजेच पाचवा दिवस दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार असून क्रिकेट रसिकांचे लक्ष सुरु असलेल्या सामन्याकडे लागले आहे. इंग्लंडचे ६ खेळाडू बाद झाले असून भारताला विजयासाठी केवळ ४ बळींची गरज आहे. तर इंग्लंडसमोर अद्यापही १९० हुन अधिक डावांचा डोंगर आहे. सध्या २ रे सत्र सुरु असून अजून १ सत्र बाकी आहे. त्यामुळे इंग्लंड सध्या संथ गतीने खेळून सामना अनिर्णित करण्याची रणनीती आखत आहे.

असं असलं तरी भारतीय गोलंदाज देखील भेदक मारा करून बळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असून जो संघ हा सामना जिंकेल त्याच मालिकेतील पारडं जड होणार आहे. त्यामुळे मालिका विजयासाठी हा सामना महत्वाचा आहे. जो रूट हा खेळत असून त्याची विकेट मिळाल्यास भारत विजयाच्या आणखी जवळ जाईल. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात १०० बळींचा महत्वाचा टप्पा पार केला असून त्याने केवळ २४ सामन्यात हा टप्पा गाठला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!