🕒 1 min read
महाराष्ट्र देशा – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी जिल्ह्यात शिवसेनेने चांगलीच उभारी घेतली आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातुन कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.तर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे.
आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब पाटील, आ.शंभूराजे देसाई, आ.मकरंद पाटील यांच्या नावांची चर्चा असून कोणाला मंत्रिपद मिळणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन,कॉग्रेसची एक, भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन असे आमदार निवडून आले आहेत.
राज्यात गेले महिनाभर सत्तासंघर्ष चालू होता आणि आता त्यांनतर महाविकासआघाडीच सरकार राज्यात स्थापन झालं आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून आ.मकरंद पाटील यांचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.तर आ.बाळासाहेब पाटील ही पहिल्यापासून शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याने त्यांच नाव सुद्धा नाकारलं जाऊ शकत नाही.
पश्चिम महाराष्ट्रात कॉग्रेसला मजबूत करायचं असेल तर आ.पृथ्वीराज चव्हाण हे नाव खूप महत्वाचं आहे.तसेच आ.पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठ नाव आहे.त्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांचं नाव कन्फर्म मानलं जात आहे.पाटणचे आ.शंभूराजे देसाई यांनी जिल्ह्यात शिवसेनेला उभारी देण्याचं काम केलं आहे.त्यामुळं शिवसेनेकडून शंभूराजे देसाई यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1203614267695493122?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203615355827916801?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203310546054836225?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

