Share

यूपीमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? प्रियंका गांधींच्या उत्तरावरून राजकीय चर्चांना उधान

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच रंगले आहे. उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिलेल्या उत्तरावरून आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल उघडपणे सांगितले नाही. मात्र त्यांनी स्वतःच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे म्हटले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी त्यांना विचारले की यूपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका यांनी सांगितले की, ‘तुम्हाला यूपीमध्ये दुसरा चेहरा दिसतो का? तुम्हीच सांगा तुम्हाला यूपीमध्ये कोणता चेहरा दिसत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीत उत्तर प्रदेशसाठी युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने 20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 8 लाख नोकऱ्या फक्त महिलांना दिल्या जातील. असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. मात्र प्रियंका गांधी यांनी दिलेल्या उत्तरावरून आता राजकीय चर्चांना उधान आले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!