🕒 1 min read
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ठाकरे यांच्यासमोरच राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली.
नारायण राणे म्हणाले की, गोवा हायवेच्या कामात कंत्राटदारांना कोण अडवतं? असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणेंनी केला. राणे म्हणाले की, आमचं भागवा आणि काम सुरु करा अशी भूमिका कुणी घेतली ते आज मंचावर उपस्थित आहेत, असंही राणे म्हणाले. राणे म्हणाले की, विमानतळ झालंय मात्र बाहेरचे रस्ते खराब आहेत. इथले लोकप्रतिनिधी काय करतात याची चौकशी करण्यासाठी कुणीतरी नेमा, असंही ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले. आदित्य ठाकरे हे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. तर विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा असंही राणे म्हणाले.
नारायण राणेंनी आपल्या भाषणात चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच स्थानिक पातळीवर त्यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. “विमानतळाला विरोध करणारे इथे स्टेजवरच आहेत, भांडं काय फोडायचं आणि किती फोडायचं?” असा सवाल करत नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
