Share

दवाखान्यात दाखल होण्यापेक्षा मी जेलमध्ये खितपत मृत्यू पत्करेन असे स्टॅन स्वामी का म्हणाले होते ?

Published On: 

मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी दुपारी दीड वाजता निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात स्टॅन स्वामी आरोपी होते असून त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक करण्यात आली होती.

मुंबई हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर २ मे रोजी स्वामींना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. नुकत्याच कोरोनामधून बरे झालेल्या स्वामींची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईच्या हॉली फॅमिली हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे स्वामी आणि एल्गार प्रकरणातील त्यांच्या सहकारी आरोपींनी तळोजा कारागृहात आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या आहेत.

स्वामी यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी त्यांच्या वकिलांनी सोमवारी सकाळी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कारण रविवारी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. स्वामींना मे महिन्यापासून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने त्यांना रविवारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, स्वामींची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांचे वकील मिहिर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एल्गार परिषद व कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्याऐवजी आपला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती स्वामी यांनी उच्च न्यायालयाला केली होती. मला जे.जे. रुग्णालयात दाखल करू नका. त्याऐवजी मी कारागृहात मरण पत्करेन, असे स्वामी यांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाला सांगितले होते.

न्यायालयाला उपचारांच्या बाबत बोलताना स्वामी म्हणाले होते की, आठ महिन्यांपूर्वी मला तळोजा कारागृहात आणण्यात आले होते. तेव्हापासून प्रकृती खालावतच असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आठ महिन्यांपूर्वी मी माझी सगळी कामे स्वत: करत होतो, लिहीत होतो. मात्र गेल्या आठ महिन्यांत माझी स्थिती एवढी खालावली आहे की प्रत्येक कामासाठी मला आधार घ्यावा लागत आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. मला जेजे रुग्णालयात दाखल व्हायचे नाही, तेथील व्यवस्था कशी आहे याचा दोनदा अनुभव घेतला आहे. ते मला काय औषधे देतील माहीत नाही. त्यामुळे तेथे दाखल होण्याऐवजी कारागृहात अशा स्थितीत त्रास सहन करून येथेच मरेन असे ते म्हणाले होते.

फादर स्टॅन स्वामी यांची थोडक्यात माहिती

फादर स्टॅन स्वामी हे झारखंडमधील एक सामाजिक कार्यकर्ते होते. स्टॅन स्वामी हे मूळचे केरळचे होते. आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. ते गेल्या अनेक वर्षांपासून वंचित घटकांसाठी कार्य करीत होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२० त्यांना रांची येथून अटक करण्यात आली होती.

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये सहभागी झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. झारखंडमध्ये नक्षलींशी संबंध असल्याच्या राष्ट्रीय तपास संस्थेने नामकुम स्टेशन हद्दीत असलेल्या निवासस्थानातून फादर स्टॅन यांना ताब्यात घेतले. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते. त्यांची श्रवणशक्ती कमी झाले आहे. तसेच लंबर स्पॉन्डिलायसिसमुळे ते त्रासलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!