Share

तुम्हाला बस, रेल्वे जाळण्याचा अधिकार कोणी दिला? अभिनेत्री कंगना रणौत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व दुरुस्ती कायदावरून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतासह देशातील अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले होते. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. यात सार्वजनिक मालमत्तेच प्रचंड नुकसान झालं आहे. या कायद्याविरोधात सिनेसृष्टीतील कलाकारांनीही भूमिका मांडल्या आहेत. मात्र अभिनेत्री कंगना रणौतने हिंसक आंदोलन करणाऱ्यांना फटकारले आहे.

अभिनेत्री कंगनाने तिचा आगमी चित्रपट ‘पंगा’च्या प्रमोशन दरम्यान ती म्हणाली, ‘‘जेव्हा तुम्ही आंदोलने करता तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हिंसक होऊ नये. आपल्या लोकसंख्येच्या ३ ते ४ टक्के लोकं फक्त टॅक्स भारतात, बाकी लोक त्यांच्यावर आधारित आहेत. तुम्हाला बस, रेल्वे जाळण्याचा अधिकार कोणी दिला? एका बसची किंमत जळपास ७० ते ८० लाख रुपये असते. ही छोटी रक्कम नाही. तुम्ही कधी आपल्या देशातील लोकांची परिस्थिती पाहिली आहे का? काही लोक उपाशी आणि कुपोशीत मरतात”.

पुढे ती म्हणाली, “हे माझं वैयक्तिक मत आहे की, लोकशाहीच्या नावाखाली आपण अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळात असल्यासारखं वाटते. ज्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता. लोकांना बळाच्या आणि बंदूकीच्या धाकावर डांबून ठेवलं जात होतं. परकीय सत्तेविरुद्ध आंदोलन करणे, देश बंद करणे, कर न भरणे चालायचे. परंतु आज लोकशाहीमध्ये आपले नेते आपल्यापैकीच आहे. ते काही काही जपान, इटलीहून आलेले नाहीत”.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209380941812027393?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209380740506349568?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!