Share

कुस्तीपटू प्रिया मलिकचे अभिनंदन करताना भूमिकडून झाली मोठी चुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रविवारचा दिवस भारतीय क्रिडा जगतासाठी खुपच आनंद देणारा ठरला. ऑलिम्पीक स्पर्धेत भारताने टेबल टेनीस, बॉक्सिंग आणि बॅडमिंटन मध्ये विजय मिळवला. तर जागतीक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने भारताकडून सुवर्णपदकाची कमाई केली. आणि क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

यादरम्यान जगात सगळीकडे ऑलिम्पिक स्पर्धेचा ज्वर चढला आहे. यामुळे प्रिया मलिकने पटकावलेले सुवर्ण पदक हे ऑलिम्पिक स्पर्धेतील आहे असा अनेक जणांचा गैरसमज झाला होता. या गैरसमजामुळे बॉलीवूड अभिनेत्री भुमी पेडणेकरला सोशल मीडीयावर ट्रोल केले जात आहे. भुमीने प्रिया मलिकचे अभिनंदन करताना टोकीयो ऑलिम्पिक असा हॅशटॅग वापरला होता. यामुळे पुरेशी माहिती न घेता घाईत केलेल्या या पोस्टमुळे भूमि पेडणेकर सोशल मीडीयावर ट्रोल होत आहे.

भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरी येथील बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात प्रियाने ७३ किलो वजनगटात बेलारुसची कुस्तीपटू केस्निया पट्टापोव्हिचचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. मात्र यादरम्यान जापान येथे टोकियोत सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमुळे तिने जिंकलेले हे पदक ऑलिम्पिकमधील आहे असा गैरसमज झाला. या गैरसमजामुळे अनेक भारतीयांनी तिला ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकल्याबद्दल अशा आशयाची पोस्ट करत अभिनंदन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!