Share

ज्याचा त्याचा मान ठेवणार, प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम होणार; ‘त्या’ कार्यक्रमावर राऊतांचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वाद काही शमल्याचे दिसत नाही. येत्या ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी १२.३० वाजता विमानसेवाही सुरु होणार आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याची चर्चा आहे. निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याचा राणेंचा सूर आहे. यावरुनच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत राणेंवर निशाणा साधला आहे.

“कुणाला बघून आम्हाला कार्यक्रम करायचा नाही. शासकीय पेट्रोकॉलप्रमाणे ज्यांना ज्यांना बोलवणं आवश्यक आहे. त्या सर्वांना मान सन्मानाने बोलावण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यात फार मोठा योगायोग नाही, इतर जे सांगत होते आम्ही यांना बोलावणार नाही, त्यांना बोलावणार नाही, अशा कुत्सित भावनेतून हा कार्यक्रम नाही. ज्यांचा मान सन्नान आहे त्यांचा मान महाराष्ट्र सरकार करणार आहे. विमानतळाचे श्रेय आम्हाला घ्यायचं नाही तर ते आमचे कर्तव्य आहे”, असं सांगायला देखील विनायक राऊत विसरले नाहीत.

“केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कुठे कोण आहे, तीन नंबरच्या स्थानावरून उहापोह करतील तर त्यांचं ते अज्ञान आहे. त्यांना नेमकं कळत नाही की शासनाचा प्रोटोकॉल काय आहे, त्यांनी चांगला गुरू करावा म्हणजे त्यांना चांगले मागदर्शन मिळेल”, असा खोचक टोला विनायक राऊतांनी राणेंना लगावला आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तर तिसऱ्या क्रमांकावर नारायण राणे यांचं नाव आहे. चिपी विमानतळावरुन शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!