मुंबई : फटाके, दिवे, आकाश कंदील, रांगोळी नवीन कपडे या सगळ्या गोष्टीसह दिवाळीचा सण फराळाशिवाय अपूर्णच आहे. या सणात कुटुंबाने एकत्र मिळून फराळ करणे आणि खाणे काही वेगळाच आनंद असतो. अशातच ‘आई कुठे काय करते’ फेम ‘संजना’ म्हणजेच रुपाली भोसलेने दिवाळीचा फराळ करताना हटके अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान रुपालीने घरात करंज्या बनवतानाचा व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये रुपाली दिवाळीचा फराळ करताना दिसत आहे. सुरुवातीला ती करंज्या तयार करते आणि नंतर तळते. याआधी ती बेसनाचे लाडू करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिला प्रश्न विचारते होते. खास गोष्ट म्हणजे रुपालीने देखील या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. तिचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/reel/CVzTQSDj4DF/?utm_medium=copy_link
रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉस मराठीने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे ‘संजना’ नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- भाजपचा पूर्ण पराभव झाल्यास पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होणार; राऊतांचा दावा
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- ‘केंद्राने पाऊल उचलले चला राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला’ भाजपचे राऊतांना आवाहन
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला


