नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. आता ही लाट ओसरत असल्याचं दिसून येत असलं तरी कोरोना विषाणूचे नवीन प्रकार हे अधिक घटक असल्याचं देखील समोर येत आहे. अशातच, काही तज्ज्ञांनी येत्या २-३ महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवली आहे. यासोबतच, या लाटेत लहान वयोगटाला अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र, याबाबत ठोस कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.
तर, इतर तज्ञांनी बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता व्यक्त केल्याने हा धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस या वयोगटात देखील उपलब्ध केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी चाचण्या सुरु असून त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे आता लहान वयोगटासाठी लस कधी उपलब्ध होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
याबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भाष्य केलं आहे. ‘भारत बायोटेकच्या कोवाक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फायझरला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.’
दरम्यान, एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये दोन ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर कोवॅक्सीनची चाचणी सध्या सुरु आहे. डीसीजीआयने 12 मे रोजी मुलांवर फेज दोन आणि तीन चाचणी घेण्यास भारत बायोटेकला मान्यता दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार ! फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली


