Share

भारतीय समाज विचार अन् कृतीची चौकट केव्हा मोडणार! -डॉ. भालचंद्र मुणगेकर

Published On: 

औरंगाबाद : शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांनीच मांडायचे, महिलांचे प्रश्न महिलांनी मांडायचे, मागासवर्गीयांच्या प्रश्नावर त्यांनीच भांडायचे अशा विचारांच्या व कृतीच्या चौकटीत अडकलेला भारतीय समाज हे केव्हा मोडणार, असा प्रश्न माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी उपस्थित केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात बुधवारी प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले. तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रात संचालक डॉ. एन. एन. बंदेला व सहसंचालक डॉ. मोहम्मद अब्दुल रापे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवसभराच्या या कार्यशाळेत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले (विषय – उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह), डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे नवीन शैक्षणिक धोरण, परीक्षा व मुल्यमापण मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांचे परीक्षा पध्दतीतील सुधारणा, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. डी. डी. गायकवाड यांनी कॅस प्रमोशन व सर्व्हिस बुक या विषयावर मार्गदर्शन केले. तर समारोपाप्रसंगी प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ यांनी चॉईस बेस्ड व्रेडिट सिस्टीम – धोरण आणि आव्हाने या विषयावर सविस्तर मत मांडले.

यावेळी डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले, समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव व सामाजिक या चतु:सूत्रीवर ७० वर्षांपूर्वी आपण प्रजासत्ताक स्थापन केले. स्वातंत्र्यापूर्वी पाहिलेले स्वप्न साकार होईल, असा आशावाद होता. तथापि आजही हे स्वप्न पुर्ण होऊ शकलेले नाही. शिक्षणावर खर्च कमी होत आहे. तेव्हा गुणवत्ता व सर्वांगीण विकास कसा साधणार. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १ लाख ३ हजार कोटी रुपयांवरून शिक्षणासाठीची तरतूद १४ हजार कोटींवर आणण्यात आली. एका बाजूला सहकारी संस्था व शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना सरकारी तरतूद कमी होत आहे ही बाब चिंताजनक आहे. कोणत्याही समाजात महिलांचे स्थान काय आहे यावर त्या राष्ट्राची उंची ठरत असते, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आपण समजून घेतले नाही, याबद्दल डॉ. मुणगेकर यांनी खंत व्यक्त केली.

उच्च शिक्षणात मोठे फेरबद्दल गरजेचे : कुलगुरू येवले

एका बाजूला जागतिकीकरणाने उच्च शिक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान व स्पर्धा निर्माण झालेली असताना भारतात उच्च शिक्षणात मोठे फेरबदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. एक तासाच्या भाषणात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कोविडनंतरचे शिक्षण, संशोधनाचा दर्जा, स्किल कोर्सेस यासह विविध विषयांचा उहापोह केला. कोविडने माणसाला खूप काही शिकवले मात्र याचा धडा आपण किती घेतला हा अभ्यासाचा विषय आहे. आगामी विद्यापीठ अर्थसंकल्पात सॉफ्ट स्किल बेस्ड कोर्सेससाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. दिवसभरात उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. डी.बी. गायकवाड, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील, प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी संचालक डॉ. एन. एन. बंदेला यांनी प्रास्ताविक, तर डॉ. मोहम्मद अब्दुल रापे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेत 210 प्राचार्यांनी सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!