Share

“माझे ‘ते’ फोटो व्हायरल करणाऱ्या सरनाईकांवर कारवाई कधी?”; किरीट सोमय्यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  रुग्णालयातील नवनीत राणांच्या फोटोसेशनवरून शिवसेनेने आक्षेप घेतला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तक्रार दाखल केली होती. यावेळी MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूंना घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले? हा मुख्य आक्षेप त्यांनी घेतला होता. या पाश्वर्भूमीवर आता किरीट सोमय्यांनी काही सवाल उपस्थितीत केले आहेत.

सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये नवनीत राणांच्या हॉस्पिटलमधील फोटोंवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते मंत्रालयातील माहिती अधिकाराखाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना बेकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईक वर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार?

असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर राज्याचे गृहमंत्री कारवाई कधी करणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!