🕒 1 min read
पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) चे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याचबरोबर भारतातूनही त्याला भरपूर प्रेम मिळते. अशा परिस्थितीत शाहीद आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान यांच्या मधील कटूता विसरून भारताच्या चांगल्या आठवणी मीडिया सोबत शेअर केले आहे. ‘लाला’ नावाच्या एका प्रसिध्द पाकिस्तानी वाहिनीसोबत बोलताना शाहिद आफ्रिदीने भारताचे कौतुक केले आहे.
या वाहिनी सोबत बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “खरंतर इंग्लंड क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये 17 वर्षानंतर आला आहे. या मालिकेतील पहिली कसोटी रावळपिंडी येथे खेळली जात आहे.” या सामन्याची चर्चा करण्यासाठी शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी टिव्ही चॅनल ‘समा’ टीव्हीवर लाईव्ह होता. या सामन्यादरम्यान तो म्हणाला की,”जेव्हा आम्ही भारतामध्ये विश्वचषक खेळण्यासाठी गेलो होतो तेव्हा मी संघाचा कर्णधार होतो. भारतात मला जाणवली की, मला पाकिस्तानकडूनही असे प्रेम मिळत नाही जसे मला भारताकडून मिळत आहे. हा एक खूप सकारात्मक संदेश आहे. भारतामध्ये जाण्याआधी मला शंका होती की मी भारतात जाऊ शकत नाही. पण मग नंतर माझ्या लक्षात आले की संपूर्ण जग तुमच्याकडे एक खेळाडू म्हणून पाहते. तुम्हाला तुमच्या खेळाची आणि देशाची प्रतिष्ठा झोपायचे असते.”
2005 नंतर इंग्लंड पहिल्यांदाच पाकिस्तानात आला आहे. पाकिस्तानने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला आपला हिरो मानला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचे आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे कौतुक सुरू आहे. सामन्याच्या काही दिवस आधी इंग्लंड संघ एका अज्ञात व्हायरसमुळे आजारी पडला होता. या परिस्थितीमध्ये ही मालिका वेळेवर सुरू होईल की नाही अशी देखील सर्वांना शंका होती. मात्र, प्रेक्षकांची निराशा न होता हा सामना नियोजित दिवशीच नियोजित वेळेत सुरू झाला. बेन स्टोक्सच्या निर्णयाची माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक झाले आहे.
बेन स्टोक्सबद्दल बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की,”बेन स्टोक्सची वागणूक चांगली होती. अशी परिस्थिती जर कायम असली तर खेळाडू अधिक अनुकूल राहतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ड्रेसिंग रूम शेअर करतात. यापूर्वी इंग्लंडने टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान मध्ये सात टी-20 सामन्यांची मालिका खेळली होती. स्टोक्सच्या जोरावर इंग्लंड संघाने हा सामना एकतर्फी जिंकला होता.”
महत्वाच्या बातम्या
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत काय आहेत आक्षेप?, जाणून घ्या
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांना तातडीने पदावरुन हटवण्याच्या मागणी याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
- Shivsena | कोल्हापूरात लोढा यांच्या विरोधात शिवसेनेची पोलीसात तक्रार, तर पोलिसांचा तक्रार नोंदवण्यास नकार
- Karnataka Govt | कर्नाटक सरकारनं पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं; जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलं
- Ram Shinde | “रोहित पवार यांनी ‘ही’ योजना बंद ठेवण्याचं पाप केलं”, राम शिंदेंचा रोहित पवारांवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
