Share

उद्धव ठाकरे जाताच शिवसैनिक भिडले, फोडली एकमेकांची डोकी

Published On: 

अहमदनगर: विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाहन ताफा निघाल्यानंतर आमदार विजय औटी आणि शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्यात वाद झाला. यामध्ये अनेक शिवसैनिक जखमी झाले आहेत.

शिवसेना आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, आमदार विजय औटी यांचे विरोधक पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या गटानं घोषणाबाजी करत दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पारनेर येथील सभेनंतर शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आला. या गडबडीत आमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक पायावरून गेल्याने शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड जखमी झाले आहेत. शिवसेनेने मात्र सदर वृत्ताच खंडन केलं आहे.

नेमके काय घडले

विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके आणि विजय औटी यांच्या गटात वाद आहेत. सुरुवातीला लंके यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मेळाव्यात येऊन शक्तिप्रदर्शन केले. भाषणात विजय औटी यांनी नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळला. याचा राग निलेश लंके समर्थकांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला. सभा संपून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती. ताफ्याच्या पाठोपाठ विजय औटीही आपल्या गाडीतून निघाले. काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीच्या मागे धावले. त्यामुळे औटी यांच्या चालकाने गाडी वेगाने पुढे घेतली. तेथे उपस्थित असलेले उपनेते अनिल राठोड यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. याचा राग आल्यावर कार्यकर्त्यांनी औटी यांच्या गाडीची काच फोडली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!