🕒 1 min read
पुणे: कोरोना पोजीटीव्ह रुग्णांची संख्या हि राज्यात झपाट्याने वाढत असून अनेक शहरे पुन्हा लोकडाऊनमध्ये जात आहेत. यातच रुग्णांची वाढती संख्या बघता ५०४ खाटांचे सुसज्ज कोविड आरोग्य केंद्र विप्रो कंपनीने लाखो रुपये खर्चून राज्य शासनाला उभारून दिले होते. मात्र, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिका नसल्याचे कारण देत शासनाला अद्याप ते सुरु करता आलेले नाही.
त्यामुळे हे सुसज्ज रुग्णालय एकीकडे धूळ खात पडले आहे तर दुसरीकडे पुणे शहरातल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात रुग्णांना जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. मुळशी तालुक्यात कोरोना पोजीटीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर विप्रो कंपनीने हिंजवडी येथे ५०४ खाटा, १० आयसीयू खाटा आणि ५ व्हेंटिलेटर असलेले सुसज्ज कोविड उपचार केंद्र उभारून दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ जूनला त्याचे उद्घाटन केले. परंतु अजूनही हे केंद्र सुरु झालेले नाही.
‘विप्रो’ ने सर्व सोयीसुविधा निर्माण करून हे केंद्र जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिले. या आरोग्य केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ जिल्हापरिषदेने द्यायचे आहे. मात्र, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण देत जिल्हा परिषदेने आता हात वर केले असून मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केले हे केंद्र आता धूळखात पडले आहे.
‘हि’ बोलायची हिम्मत पवारांनी कधी बाळासाहेबांच्या हयातात केली नाही; भाजपा नेत्याचा प्रहार
तर पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील कोरोना पोजीटीव्ह रुग्णांसाठी नवले हॉस्पिटलची दीडशे तर लवळे येथील सिम्बॉयसीस रुग्णालयाशी शंभर खाटांचा करार केला आहे. यापैकी केवळ नवले हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील ५२ रुग्ण दाखल करून घेण्यात आले आहेत. अन्य सर्व खाटा पुणे महापालिकेने तर सिम्बॉयसीस च्या सर्व खाटा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची परवड सुरु आहे.
धारावीतील कोरोना कंट्रोलप्रकरणी किरीट सोमय्यांनी केली प्रशासनाची पोल-खोल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

