Share

धारावीतील कोरोना कंट्रोलप्रकरणी किरीट सोमय्यांनी केली प्रशासनाची पोल-खोल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) सर्वच स्तरातून तेथील मॉडेलचे कौतुक केले जात आहे. परंतु भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे. धारावी भागात चाचण्यांचा आकडा हा कमी करण्यात आल्याने तेथील रुग्ण संख्या कमी झाल्याचे त्यांनी वक्तव्य केले.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘ महापौर व आयुक्त सांगत आहेत कि धारावीतून कोरोना अदृश्य झाला, मग माहीम आणि दादर हा पण जवळचा भाग असून तिथे का एवढ्या मोठ्या पद्धतीने वाढतोय’, असा प्रश्न हि त्यांनी केला. यासोबतच, धारावीतील कोरोना टेस्टिंग थांबवल्या असून फिवर कॅम्प बंद केले आहेत, स्वॅब टेस्टिंग बंद केल्याअसून काल फक्त ४९ लोकांचे सँपल घेतले तर परवा ३२ लोकांचं असे गेल्या तीन दिवसांत फक्त शंभर-सव्वाशे लोकांच टेस्टिंग केले गेले,’ असल्याचे आरोप देखील त्यांनी केले आहेत.

धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे – उद्धव ठाकरे

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगतांना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आता तेथील सत्य परिस्थिती काय हे समोर आले पाहिजे अशी भावना निर्माण होत आहे. तर एकबाजूला कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुणे जिल्ह्यासह नांदेड, औरंगाबाद, ठाणे या शहरात पुन्हा लोकडाऊन करण्यात येत आहे.

एकतर्फी निर्णय घेऊ नये,हे बापटांनी मोदींना सांगावे- रुपाली चाकणकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!