मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं. “मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत,” असं ते म्हणाले. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीचे भाग आजपासून प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली असून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत.
दरम्यान, भाजपाचे प्रदेश महामंत्री असलेले श्रीकांत भारतीय यांनी, ‘हि बोलायची हिम्मत पवारांनी कधी बाळासाहेबांच्या हयातात केली नाही…त्यांच्या अपरोक्ष हि सत्तेच्या मोहापोटी सहन केल्या जाते हे महाराष्ट्राचं दुर्दैव..’, अशा शब्दांत शिवसेना व शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
हि बोलायची हिम्मत पवारांनी कधी बाळासाहेबांच्या हयातात केली नाही…. त्यांच्या अपरोक्ष हि सत्तेच्या मोहापोटी सहन केल्या जाते हे महाराष्ट्राच दुर्दैव..#SahebKaMasterstroke #SharadPawar #LiesOfPawarSaheb #SharadPawarLies pic.twitter.com/YZPIgzIrdj
— Shrikant Tara Pandit Bharatiya (@ShreeBharatiya) July 11, 2020
तर , “बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात अंतर होतं. विशेषतः कामाच्या पद्धतीत बराच फरक आहे. बाळासाहेबांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन अशा काही व्यक्तींचा सन्मान केला. या सर्वांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला,” असं पवार यावेळी म्हणाले. “काँग्रेसशी बाळासाहेबांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. शिवसेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती असं नाही,” असंही पवार म्हणाले आहेत.
सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले
यासोबतच, शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही. अस देखील या मुलाखतीत शरद पवार म्हणाले आहेत.
धक्कादायक: वापरलेल्या पीपीई किटची विल्हेवाट लावली घंटागाडीतून !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

