औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूध आणण्यासाठी शंभर रुपयांची मागणी करणाऱ्या पतीला मारहाण करत पतीने तलाक दिला. ही शुक्रवारी (दि.१६) सिटी चौक परिसरातील अरहान गोल्ड-नाज टॉवर्समध्ये घडली. तिहेरी तलाकवर बंदी आणली असतानाही अशा घटना वारंवार घडत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शहरातील सिटी चौक परिसरात राहात असलेल्या शहेबाज अली खान मकसूद अली खान (वय ३२) हा शुक्रवारी घराबाहेर गेला होता. त्यावेळी घरी परत येताना पत्नीने त्याला दूध आणण्याचे सांगितले होते. पण शहेबाजने आणले नाही. त्यामुळे घरी येताच पत्नीने त्याला याबाबत जाब विचारला. त्यावर शहेबाजने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.
रागावलेल्या पत्नीने तुमच्याकडे शंभर रुपयेसुद्धा नाहीत का, असा सवाल केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शहेबाजने पत्नीला शिवीगाळ, मारहाण करून तीन वेळा तलाक शब्द उच्चारून घराबाहेर हाकलले. तसेच घरात पुन्हा आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून विवाहितेच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात शहेबाजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जास्तीचे पैसे दिले की रेमडेसिविर कसे मिळते?’, आ.धस यांचा सरकारला सवाल
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
- ८० कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भामटा गजाआड
- संजय राठोडनंतर यवतमाळचे नवे पालकमंत्री भुमरे विस्कटलेली घडी कशी बसवणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

