जालना : कोरोना लस ही पुर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांनी लस टोचून घ्यावी , असे अवाहन राज्याचे आरोग्यमंत्री व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. डीपीसीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आतापर्यंतच्या आकडेवारी नुसार पावणेचार आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतली आहे.
कोरोना लसीकरनाच्या कार्यक्रमात आरोग्य विभागाने प्रथम प्राधान्य हे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातील पावणेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणानंतर या आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत असल्याचे आरोग्यमंत्र्यानी सांगितले. लवकरच कोरोना लसीकरनाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचारी असलेल्या महसूल, पोलिस व नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.
जेव्हा लोकप्रतिनिधींची वेळ येईल तेव्हा पहिली लस मी स्वत: घेईन असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगीतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी लागणारे आवश्यक डोस उपलब्ध होत आहे. सध्या इमर्जन्सी वापरासाठी दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता मिळालेली आहे. उर्वरित कंपन्यांचे फेज ३ ट्रायल अपूर्ण असल्यामुळे त्यांना मंजुरी नाही. मात्र, तिन्ही ट्रायल पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही मंजुरी मिळेल. असे आरोग्यमंत्र्यानी सांगीतले.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’
- अभ्यासू आमदार अशी प्रतिमा असलेल्या प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने सोपविली नवी जबाबदारी
- मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी ! अशोक चव्हाणांची केंद्राला गळ
- ‘फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती’
- ‘फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
