Share

बार सुरु झाले चित्रपटगृहे देखील खुली होणार, तरीही राज्यात अभ्यासिका,ग्रंथालय आणि मंदिरे बंदच राहणार ?

Published On: 

नवी दिल्ली- केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज चित्रपट प्रदर्शनासाठी एसओपी जारी केली. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर ही एस ओ पी निश्चित करण्यात आली आहे.

“गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबर 2020 पासून चित्रपटगृहे खुली होतील. त्यादृष्टीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही सामायिक मानके प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे,” असे ही एसओपी जारी करताना मंत्री म्हणाले.

दरम्यान,एका बाजूला केंद्र सरकार या सर्व बाबींना परवानगी देत आहे तर  हे सर्व सुरु होत असताना राज्यात अजूनही अभ्यासिका,ग्रंथालये,तसेच मंदिरे बंद असल्याचे चित्र आहे. यात अभ्यासिका,ग्रंथालये बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे ज्या क्षेत्रातून जास्त इन्कम त्या क्षेत्राला जास्त सवलती दिल्या जात आहेत का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान,जावडेकर यांनी चित्रपटगृहांबाबत  दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आणि कर्मचाऱ्यांचीही तापमान तपासणी, पुरेसे शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टीने चेहऱा झाकणे, सातत्याने हात धुणे, हँड सॅनिटायझरचा वापर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, बाहेर पडण्यासाठी ठराविक मार्ग इत्यादी आहेत. एकूण क्षमतेच्या पन्नास टक्केच आसनक्षमता वापरली जाईल याची व्यवस्था इत्यादींचा समावेश आहे. मल्टिप्लेक्स मधे चित्रपटाच्या खेळांच्या वेळा एकापाठी एक न ठेवता विखूरलेल्या असाव्यात. चित्रपटगृहातील तापमान 24०C तरी ते 30०C दरम्यान असणे आवश्यक.

चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात करतानाच सर्व राज्ये व संबंधितांनी ह्या मार्गदर्शक सूचनांचा आणि एसओपीचा वापर करावा. चित्रपटांचे प्रदर्शन सुरू करणे ही मोठी आर्थिक घटना असून आपल्या देशाच्या जीडीपीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आताच्या कोविड-19 प्रकोपाच्या पार्श्वभूमीवरही चित्रपट प्रदर्शन सुरु करताना सर्व संबंधितांनी महामारी पसरू नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!