Share

हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर- आशिष शेलार

Published On: 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. तर परिवहन मंत्री अनिल परब वारंवार कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आज या आंदोलनात हजेरी लावली आणि या संपाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना शेलार म्हणाले की,’महाराष्ट्रातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब, दीन, दलित, पीडित, शोषित, युवा, महिला, शेतकरी, बारा बलुतेदार आणि सर्वांची सेवा करणारा जर कोणी एक वर्ग असेल तर तो म्हणजे एसटी कामगार. दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, सुखादुःखात कुठेच सहभागी होत नाही. फक्त सकाळी उठतो आणि आपल्या नोकरीला रुजू होतो. माझी नोकरी म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हेच व्रत घेऊन काम करणारे तुम्ही आहात. म्हणूनच तुम्हाला सलाम करायला मी आलोय. ही लढाई केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नसून ही लढाई महाराष्ट्रातल्या दीनदलित, वंचित समाजाला न्याय देण्याची आहे.’.

दरम्यान, मागणी आपली सोपी आहे. आम्हाला सुद्धा शासकीय कर्मचारी म्हणून ओळख द्या आणि त्यासाठी एक वाक्याचा जीआर काढा. मीसुद्धा मंत्री राहिलो आहे आणि आधीपासून आत्तापर्यंत एक वकील आहे. शब्द फिरवावे तसे फिरतात. शब्दांचं मायाजाल हे घालावं तसं आहे. आत्ताचं सरकार हे मायावी सरकार आहे. मायावी राक्षस जसा असतो, तसं हे सरकार मायावी शब्दात सामान्य माणसाला भुलवण्याचं एक चांगलं स्कील या सरकारकडे आहे. हे मायावी शब्दात तुम्हाला अडकवायला बघतील. मी मायावी यासाठी म्हटलं की हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!