जळगाव : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या राजकारणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. भाजपाचे नेते गोपिनाथ मुंडे यांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही, अशी विचारणा गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना टीव्हीवर मात्र, चीनची बातमी दिसत नाही. अस गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
तर, एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही ? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- मनसेने फोडले पाथर्डीतील राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय, अभियंत्याच्या खुर्चीला घातला चपलांचा हार!
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- पंतप्रधान कांद्याचे वांदे करत आहेत – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

