Share

जपान ऑलिंपिक साठी सज्ज भारतात पात्र खेळाडूंचे लसीकरण कधी ?

Published On: 

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून कोरोना या जगभर थैमान घातलेल्या महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम केला आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. याला जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जाणारी ऑलिम्पिक २०२० साली जपानची राजधानी टोकियो येथे पार पडणार होती. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऑलिम्पिक स्थगित केली गेली होती.

जगातील क्रीडारसिकांसाठी सर्वात मोठी पर्वणी मानल्या जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० यादरम्यान ही स्पर्धा होणार होती. त्यानंतर, २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात ही स्पर्धा आयोजित करण्याचे नक्की केले गेले होते.यावर आता ही स्पर्धा कोणत्याही परीस्थितीत पार पडणार असल्याच आश्वासन जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिले आहे. याविषयी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

भारताच्या ऑलिंपिक पात्र खेळाडूंच्या करोना लसीकरणाबाबत अद्यप पावले उचालेली नाहीत. या बद्दल भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सिचव राजीव मेहता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या तरी ऑलिंपिक पात्र खेळाडूंना कधी लस देणार याबाबत काहीच सूचना नसल्याच त्यांनी सांगीतल. आतापर्यंत तिरंदाज, मुष्टियोद्धे, पुरुष, महिला हॉकी संघ, धावपटू आणि कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी रद्द करण्यात आलेली ऑलिंपिक स्पर्धा यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारतीय खेळाडूंना लस कधी देण्यात येणार याबाबत मेहता यांनी केंद्रिय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी पत्र संवाद केला आहे.

लसीकरणाची सर्व पद्धत आणि लशीचा साठा लक्षात घेऊन ऑलिंपिक पात्र खेळाडूंना लसीचे दोन डोस द्यावेत अशी मेहता यांनी आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे. सध्या आपले खेळाडू विविध केंद्रांवर सराव करत आहे. लशीकरणाचा कार्यक्रम निश्चित झाला की आम्ही तशा सूचना त्यांच्या क्रीडा संघटनांना देऊ. या संदर्भात लवकरात लवकर मार्गदर्शन करावे. ऑलिंपिक पात्र खेळाडूंचे लशीकरण वेळेवर व्हावे हीच आमची इच्छा असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

ऑलिंपिकसाठी आता केवळ पाच महिने उरले आहेत. लशीचे दोन डोस आवश्यक  असल्यामुळे ते वेळेत देण्यात यावे. आरोग्य मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली, तरी अजून काहीच सूचना नाहीत. यासाठी हा पत्र प्रपंच करावा लागला, असे मेहता म्हणाले. नुकतेच केंद्रिय क्रीडा मंत्र्यांनी ऑलिंपिक पात्र खेळाडूंना प्राधान्याने लस दिली जाईल, असे जाहिर केले होते. मात्र, अजूनही अनेक देश करोना संकटाचा सामना करत असल्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजनच अंधातरी असल्यामुळे चालढकल होत असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!