Share

सून जेव्हा सासू बनते तेव्हा तिने आपल्या सुनेचा छळ करू नये – रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘सून जेव्हा सासू बनते तेव्हा तिने आपल्या सुनेला त्रास देऊ नये. स्त्रियांनी स्त्रियांच्या भावना आधी समजून घेतल्या पाहिजेत. आपल्या घरी येणाऱ्या सुनेचा आपल्या मुलीप्रमाणे सन्मान आणि सांभाळ केला पाहिजे. त्यामुळे महिलांच्या सासरी होणाऱ्या छळाच्या घटना घडणार नाहीत. समाजात स्त्रीपुरुष समता यावी हाच जागतिक महिला दिनाचा संदेश आहे,’ असे सांगत महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जागतिक महिला दिना निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडी तर्फे महिला खेळाडूंचा सत्कार ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आज झाला. रामदास आठवले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या सत्कार सोहळ्यास रिपाइं क्रीडा आघाडीचे प्रमुख दिनेश कांडा, गीतांजली शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला खेळाडूंचे प्रश्न त्यांच्या काही समस्या असतील तर त्या आपण निश्चित सोडवू. महिला खेळाडूंचा सत्कार करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

विधानसभा आणि लोकसभेत महिलांना आरक्षण देण्यासाठी घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट !

विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 आरक्षण देण्याचा कायदा अद्याप प्रलंबित आहे. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारा कायदा संसदेत मंजुर करावा यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!