Share

मेगाब्लॉकमुळे नांदेडहून मुंबईकडे जाणार्‍या तीन एक्स्प्रेस रद्द

Published On: 

परभणी : मध्य रेल्वे विभागाअंतर्गत मुंबई भागात दोन दोन रेल्वे स्थानकावर रेल्वे भुयारी व पादचारी पुलाच्या कामामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाड्या १३ मार्चपासून रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तीन गाड्या रद्द झाल्याने प्रवाश्याचे हाल होणार आहेत.

खडवली आणि वसिंद रेल्वे स्थानकामधील लेवेल क्रोसिंग क्र. 61 वर आणि आसनगाव ते आडगाव रेल्वे स्थानकादरम्यान लेवेल क्रोसिंग क्र. 68 वर भुयारी पुलाकरिता आर. एच. गर्डर टाकण्यात येणार आहे. तर कल्याण ते कसारा सेक्शनमध्ये शहाद रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे ब्लॉक घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नांदेड विभागातील मुंबईकडे धावणाऱ्या तीन गाड्या रद्द केल्या आहेत.

या गाड्या झाल्या रद्द 

नांदेड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (गाडी क्र. 07617) ही एक्स्प्रेस 13 मार्चपासून पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसटी (मुंबई) ते नांदेड ही (क्र.07618) ही येणारी एक्स्प्रेससुध्दा रद्द करण्यात आली आहे. सिकंदराबाद ते सीएसटी (मुंबई) (क्र. 07058) मुंबईकडे जाणारी तसेच सीएसटी (मुंबई) ते सिकंदराबाद (क्र.07057) ही एक्स्प्रेस गाडी रद्द कर्यात आली आहे. सीएसटी (मुंबई) ते आदिलाबाद (क्र.01141) व आदीलाबाद ते सीएसटी (मुंबई) (क्र.01142) ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!