Share

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णवाहिकेसाठी रुग्ण तब्बल १४ तास ताटकळला

Published On: 

🕒 1 min read

जालना: सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वर्षभरापासून कोविडच्या संकटाला तोंड देत असून देखील आरोग्य यंत्रणा किती उदासीन आहे, याचा एक गंभीर प्रकार आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात समोर आला आहे. एका कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहचवण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने त्याची परवड समोर आली आहे. या रुग्णाला जालन्यातील हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातून जालना येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल १४ तास ताटकळत बसावं लागल्याचं समोर आलं आहे.

कोरोना आजारासारखी लक्षणं दिसल्यानंतर हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केल्यानंतर या वृद्धाचा अहवाल काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास पॉझिटिव्ह आला. या रुग्णाची प्रकृती खालावत असल्यानं त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रात्री ११ वाजेपर्यंत वात पहावी लागली. म्हणजे तब्बल १४ तास हसनाबाद येथील शासकीय दवाखान्यातच ताटकळत बसावं लागलं.

१०८ नंबर वर कॉल करूनही रुग्णवाहिका न मिळाल्यानं या रुग्णाला तब्बल १४ तास मनस्ताप सहन करावा लागला. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात कुठलीही कसर सोडत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येतो. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातच असे प्रकार समोर येत असतील तर नेमका सत्य कशाला मानावे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याचा आरोप या कोरोना बाधित रुग्णाच्या मुलाने केला आहे.

यापुढे अशी दिरंगाई होणार नाही
जवळच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी काही रुग्णवाहिका गेलेल्या होत्या. तर काही रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी असल्यानं या रुग्णाला सेवा देण्यात आरोग्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला असून यापुढे अशी दिरंगाई होणार नाही,असं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!