कॉलिंग दर स्वस्त झाल्यानंतरही, आजकाल मोबाइल वापरकर्त्यांना मेसेजवर बोलणे सोपे वाटते. कारण मेसेंजरवर एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींशी बोलणे शक्य आहे. तसेच, मेसेजिंग करताना चुकीचे संदेश पाठवणे सामान्य आहे, म्हणूनच व्हॉट्सअप आपल्या नवीन अँड्रॉइड अपडेट मध्ये एक नवीन फीचर घेऊन येत आहे, ज्यामुळे पाठवलेले संदेश पुन्हा एडिट करता येतील. व्हॉट्सअपचे नवीन फीचर कसे काम करेल, जाणून घ्या!
व्हॉट्सअप नवीन अपडेट
व्हॉट्सअपच्या या नवीन फीचरवर अजून काम सुरू आहे. आणि व्हॉट्सअप हे नवीन फीचर व्हॉट्सअप बीटा च्या नवीन अँड्रॉइड अपडेट 2.22.20.12 साठी तयार करत आहे. जोपर्यंत हे फीचर पूर्णपणे तयार होत नाही आणि लॉन्च होत नाही तोपर्यंत कंपनी तज्ञांना त्याच्या चाचणीसाठी हे फीचर प्रोवाइड करू शकते.
मात्र, हे फीचर कसे काम करेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण व्हॉट्सअप एडिट केलेल्या मेसेजच्या वर एडिट केलेले लेबल दिसू शकते, तसेच या एडिटिंग फीचरला देखील डिलीट फॉर एवरीवन मेसेज सारखा मर्यादित काळ असू शकतो.
ऑनलाइन प्राइवेसी कंट्रोल
त्याच वेळी, WaBetaInfo नुसार, व्हॉट्सअपने आणखी एक फीचर सुरू केले आहे. ज्याद्वारे तुम्हाला व्हॉट्सअपवर ज्याला दाखवायचे आहे, त्याला तुम्ही ऑनलाइन दिसाल. सध्या, हे वैशिष्ट्य केवळ अँड्रॉइड बीटा परीक्षकांच्या (तज्ञ) चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्हॉट्सअपचे हे नवीन फीचर व्हॉट्सअप बीटा अँड्रॉइड 2.22.20.9 च्या अपडेटसह युजर्सला मिळणे सुरू होईल. या फीचरची घोषणा करताना, व्हॉट्सअपने सांगितले की, प्रत्येकाला त्यांच्या जवळच्या लोकांशी व्हॉट्सअपवर बोलणे आवडते, परंतु बर्याच वेळा वापरकर्त्याची इच्छा असते की त्याचे व्हॉट्सअप वापरताना कोणीही त्याला त्रास देऊ नये. अशा लोकांसाठी, हा पर्याय खूप चांगला असेल आणि वापरकर्ता ऍप्लिकेशनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे बदल करू शकेल, व्हॉट्सअप या महिन्यात वापरकर्त्यांसाठी हे फीचर सुरू करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “… म्हणून गुलाबराव पाटलांनी त्यांचा आजा बदलला”, अंबादास दानवेंचा घणाघात
- Maharashtra Rain Updates | राज्यभरात पावसाचा जोर कमी, मराठवाड्यासह विदर्भात ‘यलो अलर्ट’!
- Supriya Sule | “शहराला अजूनही पालकमंत्री नाही, म्हणूनच मी खासदार या नात्याने…’, सुप्रिया सुळेंनी प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
- Narayan Rane | नारायण राणेंना झटका! अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे हायकोर्टाचे आदेश
- Maharashtra Board Exam Time Table | महाराष्ट्र बोर्डाकडून १०वी, १२वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा!
- Narayan Rane | नारायण राणेंना दणका! मुंबई हायकोर्टाने अधिश बंगल्याचा मागणी अर्ज फेटाळला


