Share

‘..म्हणून मी राज्यातील घडामोडींवर काहीही न बोलता शांतपणे पाहतेय’, ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर पंकजा मुंडेंचा खुलासा

Published On: 

बीड : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दिसून येत नाहीयेत. १६ ऑगस्ट रोजी बीड येथे भाजपच्या एका मेळाव्यात त्यांनी प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर त्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या दिसल्या नाहीत. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतरही त्यांनी कोणतीच टिप्पणी केली नाही. याबाबत ‘महाराष्ट्र देशा’ने वृत्त प्रकाशित केले होते.

मात्र, त्या कुठे होत्या आणि सध्या कुठे आहेत याचा खुलासा पंकजा मुंडे यांनी स्वत: केला आहे. पंकजा यांचा मुलगा आर्यमन हा चार वर्षांच्या उच्च शिक्षणासाठी बोस्टन येथे गेला आहे. यामुळे पंकजा मुंडे सध्या त्याच्यासोबत आहेत. त्यांनी फेसबूक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. वाचा त्यांची पोस्ट, त्यांच्याच शब्दांत..

‘हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?’.. मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमन च्या आई च्या रोल मध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस.. आर्यमन आता #Boston मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.. मी त्याच्या hostel वर त्याला सोडण्यासाठी आले आहे.. आर्यमन ची 10 वी झाली, 12 वी झाली मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही,10 वी च्या परीक्षा चालू होत्या एकही पेपर च्या साठी मी उपस्थित नव्हते, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या.. आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणुन संपूर्ण वेळ त्याला देत आहे.. म्हणुन कशावर काही टिप्पणी न करता बघते आहे राज्याच्या आणि देशाच्या घडामोडी’ असे त्या म्हणाल्या.

https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/4317268208358707

‘तरीही इथे देखील घडले असे की मध्य प्रदेश च्या लोकांनी मला डाळ बाटी च्या कार्यक्रमासाठी बोलावले आणि मी प्रभारी असल्यामुळे हक्काने पोचले विदेशी वातावरणात आपल्या जेवणाच्या स्वादाची मजा वेगळीच आहे.. त्यांचे देशाच्या विषयी प्रेम आणि काही सेवा करण्याच्या इच्छा पाहून मी प्रभावित झाले.. खूप बोलले, अनेक कार्यक्रम ही ठरले. शेवटी इथे ही नाही म्हणाले तरीही बीजेपी च्या राष्ट्रीय सचिव या भूमिकेत, राजकारणाच्या भूमिकेत आलेच !!’

पण part time कारण priority आर्यमन आहेच.. आज जन्माष्टमी साजरी होत आहे तिथे जात आहे… सर्वांना अभिमान वाटेल असा विषय म्हणजे इथे असणाऱ्या भारतीय लोकांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल मध्य प्रदेश मधली 75 गाव smart करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.. लहान मुलानी आपल्या pocket money मधून 75 cents पासून 75 dollar पर्यंत रक्कम रोज 75 दिवस जमा करून स्मार्ट एजुकेशन साठी गरज असणाऱ्या भारतीय मुलांना laptops किवा smartphone देण्याचा plan तयार केला आहे… अनेक अश्या गोष्टी पाहून मी आनंदी झाले, नुसता भारतीय भोजनाचा स्वाद नाही तर देशाच्या अभिमानाचा गोडवा ही जिभेवर रेंगाळत आहे … जय हिंद म्हणताना यांचे डोळे चमकताना पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण आनंदाने… माझा आर्यमन एकटा कसा राहील असं वाटत आहे पण इतके पालक मिळाले की हायसे वाटले…’ या शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!