पणजी : आगामी मुंबई महानगर पालिकेसह अन्य मनपा वार्डांची राज्यसरकार आपल्याला हवी तशी मोडतोड करत आहेत, आगामी महापालिका निवडणुकींसाठी हे प्रयत्न चालवले आहेत, मात्र तुम्ही वॉर्डरचना कशीही करा, यश आम्हालाच मिळेल असे भाजपा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले, पुढच्या वर्षी राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या मनपासह नगर पालिका, नगर पंचायतीमध्ये प्रभाग रचना कशी असावी, यावर आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी, अशी काही नेत्यांची मागणी आहे. नगरपंचायतीमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. राज्य सरकार वार्डाच्या पुर्नरचणा करण्याच्या नावाखाली मुंबई मनपातील वार्डांची मोडतोड करत आहेत. राज्य सरकाच्या या धोरणाविषयी आम्ही निवडणुक आयोगाला कळवलं आहे. गरज पडल्यास कोर्टातही जाऊ असा इशारा भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंदे फडणवीस यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची; जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा’
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

