औरंगाबाद : इथं झालेल्या जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत भारतमाता क्रीडा मंडळाने शिस्तबद्ध संघ म्हणून पुरस्कार पटकावला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रितर्थ या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या स्पर्धेत खेळाडूंमधील शिस्तबद्धता लक्षणीय होती.
हडको, टी.व्ही. सेंटर इथल्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत औरंगाबादच्या भारत माता क्रीडा मंडळाच्या मुलांच्या संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आलं. तर याच मंडळाच्या मुलींच्या संघाने स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना कोच मुकुंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंमध्ये शिस्त असणे हे अत्यंत आवश्यक आहे. संघात शिस्तबद्धता असेल तर यश नक्कीच संपादीत करता येते. कबड्डी हा सामुहिक क्रीडा प्रकार असून त्यात शिस्तीला अत्यंत महत्त्व असल्याचं मत मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केलय. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने संघाला यश मिळाले असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर प्रथमच या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याच काम करत आहे : प्रियांका गांधी
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने ‘महाराष्ट्रातचं’ होणार ?
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

