Share

‘राज्यपालांचे करायचे काय ?’; ‘तीच तुमची खरी अडचण आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत आणि वादात सापडलेले असतात. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते वादात आहेत. यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा असो की, सरकारचा एखादा निर्णय त्याचबरोबर महाआघाडी सरकार आणि भाजप मधील टीका टिप्पणी मध्ये देखील कोशारी यांचा समावेश असतोच यावरून आजच्या सामना अग्रलेखातून राज्यापालांवर टीका करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमान उड्डाणाचा वाद सुरु असताना आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन ठाकरे सरकार वर भाजप कडून टीका केली जात आहे. तर आज शिवसेनेने ‘सामना’तून या राज्यपालांचं करायचं काय? हा भाजपचा प्रश्न असं राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हा विमान-वाद वेगळ्याच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला फडणवीस यांनी मारला. केंद्रीय गृहमंत्रालयास भारतीय संविधान, नियम, कायदा वगैरेंची चाड असेल तर अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्राला आघाडी सरकारवर नेम धरता येणार नाही. सरकार स्थिर व मजबूत आहे आणि राहील. राज्यपालांचे काय करायचे हा भाजपचा प्रश्न !

दरम्यान, याला उत्तर देताना भाजपचे आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. ‘राज्यपालांचे करायचे काय?असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही. घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचं काय? यापेक्षा जमलं तर मंत्रीमंडळातील सखाराम बायंडर प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा’, असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!