Share

‘पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा’

Published On: 

जळगाव : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

मात्र, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली.

या सर्व घटनेचे राजकीय वर्तुळात पडसात उमटत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.

‘काही लोक प्रसिद्धीसाठी काही पण करतात. गोपीचंद पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा आहे,’ अशा शब्दांत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!