Share

मोदींनी असं काय केलं आहे; की त्यांना पत्रकारांची भीती वाटते : राज ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेसाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. पण मोदींनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. याउलट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षांची आहे त्यामुळे मी उत्तर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र तिथे मोदी काहीच बोलत नाहीत. हीच मोदींची मानसिक हार आहे. यापुढची हार २३ मे रोजी होईलच, अशा शब्दांत राज यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं. तसेच पंतप्रधान मोदी पत्रकारांना इतके का घाबरतात, त्यांनी असं काय केलं आहे की त्यामुळे त्यांना पत्रकारांची इतकी भीती वाटते, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला आहे. म्हणूनच ५ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागली, अशी टीका केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!