मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्याचबरोबर सरनाईक यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
याआधी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र विधीमंडळानं बजावलेल्या हक्कभंग नोटीसाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला होता.
यावरच अभिनेता आरोह वेलणकर याने ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला चांगलेच सुनावले आहे. आरोह ट्विट करत म्हणाल, ‘कंगना आणि अर्णब ह्यांनी वैयत्तिक टीका केली कि महाराष्ट्राचा अपमान कसा काय होतो? असा सवाल त्याने महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. कुणीही काहीही बोललं कि तेच! कळतच नाही! हा कुठला माज? ही कसली मक्तेदारी??’ असे म्हणत आरोहने शिवनेला टोला लगावला आहे.
#KanganaRanaut आणि #ArnabGoswami ह्यांनी वैयक्तिक टिका केली कि महाराष्ट्राचा अपमान कसा काय होतो बुआ? काहीही झालं, कुणीही काहीही बोललं कि तेच! कळतच नाही! हा कुठला माज? ही कसली मक्तेदारी??
— Aroh Welankar (@ArohWelankar) December 15, 2020
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
- शेतकरी आंदोलन लवकर मागे घेतले नाही तर…,’सीआयआय’ने दिला धोक्याचा इशारा


