Share

स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंबनियोजनाचा सल्ला देणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांचे नेमकं चुकले काय ?

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी – भारतात सध्या लोकसंख्या वाढीचा मुद्दा चिंतेचा विषय बनत चालला आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावरून नेतेमंडळी विविध वादग्रस्त विधाने देखील करत असतात. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी येथील सरकारी जमिनीवर अल्पसंख्याकांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले. याबाबत बोलताना सरमा म्हणाले, जमिनीवरील अतिक्रमणासारख्या सामाजिक संकटावर तोडगा काढायचा असल्यास स्थलांतरीत मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल. जर लोकसंख्येचा विस्फोट सुरू राहिला तर एके दिवशी कामाख्या मंदिराच्या जमिनीवरही कब्जा होईल, एवढेच काय तर माझ्या घरावरही अतिक्रमण होईल, अशी चिंता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

देशातील दारिद्य्र कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दारिद्र्य दूर करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेत सरकारला या कामी मदत करावी, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट कमी करण्यासाठी मुस्लिमांसोबत काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अल्पसंख्याकांनी केलेले अतिक्रमण राज्य सरकारने हटविले म्हणून टीका करण्यापेक्षा विविध समाजघटकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. मुस्लिम महिलांमध्ये जनजागृती करुन कुटुंब नियोजन वाढवावे यासाठी सरकार या समुदायाच्याबरोबर काम करेल असे ते म्हणाले.

एआययूडीएफचे सरचिटणीस अनिमूल इस्लाम यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून एका समुदायाविरोधातील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला हाफिज रफिक उल म्हणाले, केवळ एका समुदायाला अशा पद्धतीने सांगणे चुकीचे आहे.  मुख्यमंत्र्यांनी जरा विचार करून बोलले पाहिजे. मुख्यमंत्री असोत किंवा स्पीकर असोत हे दोघेही  ६ -७  भाऊ असणाऱ्या कुटुंबातून येतात.मुख्यमंत्र्यांनी सर्वाना विश्वासात घेवून या प्रश्नाबाबत भूमिका घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!