Share

पाणी टंचाईमुळे देशभर चर्चेत राहिलेल्या लातूरची यंदा काय आहे परिस्थिती ?

Published On: 

लातूर : पाणी टंचाईमुळे देशभर चर्चेत राहिलेल्या लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात मुबलक पाणी साठल्यामुळ, आता लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

त्याचप्रमाणे लातूर शहराजवळ असलेल्या जलयुक्त लातूर या संस्थेन लोकसहभागातुन ज्या बंधाऱ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच काम केलं होतं, तो नागझरी आणि साई बंधाराही शंभर टक्के भरला आहे. सध्या महापालिका दररोज या दोन बंधाऱ्यातील पाण्याचा शहराला पुरवठा करत असून हे पाणी किमान तीन महिने पुरेल एवढे आहे त्यानंतर मांजरा धरणातील हक्काचं पाणी वापरता येणार आहे. काटकसरीने हे मांजरा धरणातील पाणी वापरलं तर वर्षभर पुरेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळं यंदाचा द्राक्ष हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे आणि अवेळी पावसामुळं झालेल्या शेती आणि मासेमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा संपर्क मंत्री दीपक केसरकर यांनी काल घेतला. नुकसान झालेल्या शेतीचे तसंच मत्स्य व्यवसायाचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.

गेल्या महिन्याभरापासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं 50 टक्के खरिप पिकांच नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरूवात केली आहे. नाशिकमध्ये यंदा सरासरीपेक्षा जादा एकंदर दिडशे टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील खरीपाचे क्षेत्र 7 लाख 40 हजार हेक्टर असून त्यापैकी 3 लाख 26 हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झालं आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काल सटाणा इथं जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190180009958199296?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190190566736162816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190190271394238464?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!