Share

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना पंकजा मुंडे यांनी शांत राहण्याचा नेमका अन्वयार्थ काय ?

Published On: 

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. आता रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे.

दरम्यान, आता मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आपल्या मुलांना चित्रकूट या बंगल्यावर डांबून ठेवण्यात आले असल्याची तक्रार करुणा धनंजय मुंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर करुणा धनंजय मुंडे नामक फेसबूक अकाउंटवरूनही अशाच प्रकारचा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, रेणू शर्मा यांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले मात्र बहिण पंकजा मुंडे मात्र या प्रकरणी शांत राहिल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर केवळ एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

‘तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो. मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, एका बाजूला हे आरोप झाल्यानंतर भाजप महिला आघाडीने धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले मात्र पंकजा मुंडे यांनी त्यावेळी बाळगलेल्या मौनाबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले. मौन बाळगण्याची त्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य कि अयोग्य हे पुढे ठरेल मात्र मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करणारी भाजपची महिला आघाडी रेणू यांनी तक्रार मागे घेतल्याने तोंडावर आपटली. पंकजा यांनी काही उथळ प्रतिक्रिया त्यावेळी घाईगडबडीत दिली असती तर आज त्यांना देखील तोंड लपविण्याची वेळ आली असती.

धनंजय मुंडे यांचे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर सोशल मिडिया आणि बातम्यांमधून काय जायचा तो संदेश जनमानसात गेला आहे त्यामुळे व्यर्थ बडबड न करता त्यांनी दिलेल्या या छोट्याश्या प्रतिक्रियेतून आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे. पंकजा यांनी बाळगलेले मौन आणि त्यानंतर दिलेली सावध प्रतिक्रिया हे एका मुरब्बी राजकारण्याचे आचरण जसे असावे तसेच आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यावेळी झालेल्या चुका सुधारण्याचा पंकजा प्रयत्न करत आहेत असे काहींचे म्हणणे आहे.

राजकारणात योग्य वेळी योग्य मुद्याचा,व्यक्तीचा वापर करणारे नेते राजकारणात पुढे जातात. आता भाजप निवडणुकांच्या काळात हा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी मंडळींना आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणार हे निश्चित असले पंकजा मुंडे या मुद्द्याचा वापर कश्या पद्धतीने करणार यावर लक्ष असणार आहे. सद्यस्थिती पहिली तर सरकार स्थिर आहे,इतक्यात कोणत्याहि निवडणुका देखील नाहीत हे ओळखून त्यांनी स्वीकारलेली ही भूमिका पुढे त्यांना फायदेशीर ठरणार असे जाणकार मंडळींचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!