रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे.
दरम्यान, राणेंनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेना-भाजपमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे राज्याचे राजकीय तापमान देखील वाढले होते. दरम्यान, अद्यापही हा वाद कायम आहे. काही महिन्यांपूर्वी सेना भवन येथे भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष वाढलेला असतानाच गेल्या ४-५ दिवसातील राड्यामुळे सेना-भाजप अधिक दुरावल्याचं दिसून येत आहे.
असं असतानाच आज नारायण राणे यांच्या रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत भाजप-शिवसेना युती झाली तर काय करणार ? असा सवाल करण्यात आला. यावर राणे म्हणाले, ‘मी जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. पण युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल.’ शिवसेनेवर बोचरी टीका करणाऱ्या राणेंनी या प्रश्नाबाबत मात्र सावध भूमिका उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
“तेव्हा” देखील अशाच कटुतेनंतर पुन्हा भाजप-शिवसेना युती झालेली – चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत पुण्यात बोलताना सूचक विधान केलं होतं. ‘मी भविष्यकार नाही पण सेना-भाजपमध्ये अशीच कटुता २०१४ साली होती. युती तुटल्यानंतर एकमेकांना खूप शिव्या दिल्या गेल्या. पण नंतर युतीचं सरकार स्थापन झालं. बरोबर कि चूक ते माहित नाही. आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले हसून मजा घेत आहेत. पण काही वेगळंही होऊ शकतं,’ असं विधान चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- आता भाजप ऍक्शन मोडमध्ये; अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- कोरोना इफेक्ट! शिक्षण क्षेत्रावर अवकळा; अकरावी प्रवेशातही गडबड गोंधळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

