Share

मी पाहिलेले पवार वेगळे आहेत त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले – संजय राऊत

Published On: 

मुंबई : विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. लवकरच ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

फक्त घरी बसून कामं होत नाहीत, मनसेनेही मिसळला राणेंच्या सुरात सूर

आतापर्यंत राऊत यांनी शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती.

आता सत्तास्थापनेनंतरची पहिली स्फोटक मुलाखत असेल. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे खळबळ निर्माण करणारे गौप्यस्फोट या मुलाखतीतून होतील, असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. सामनामध्ये लवकरच या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणारेत. या मुलाखतीचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

‘देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले’. अस संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय

शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत शनिवारपासून (११ जुलै) प्रसिद्ध होईल, ही मुलाखत आतापर्यंतची सर्वात वेगळी असेल. शरद पवार यांचं ज्ञानाचं भांडार लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आज देशात शरद पवांरासारखा ताकदीचा नेता दुसरा नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. लोकांनी पाहिलेले शरद पवार वेगळे अन् मी पाहिलेले वेगळे आहेत. त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले. मी महाविकास आघाडीचं सरकार बनवताना शरद पवारांची ठाम भूमिका बघितली, असं संजय राऊत यांनी सांगितले.

राज्यभर गाजत असलेल्या पारनेरच्या नगरसेवकांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी केले भाष्य, म्हणाले…

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात कोणतेही मतभेद नाहीत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत, त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असं देखील संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!