मुंबई : महाविकास आघाडीतील मतभेदांची मालिका काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश पाठवल्याच्या बातम्या आज विविध माध्यमांनी दिल्या आहेत.
अखेर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
४ जुलै रोजी अहमदनगर मधील पारनेर नगरपंचायतीच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या घटनेमुळे शिवसेनेला राष्ट्रवादीने खिंडार पाडल्याचे बोलले जात आहे. हा पक्ष प्रवेश खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीला पार पडला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला असल्याची चर्चा आहे.
‘राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले’
दरम्यान, आता या वादावर खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. झी २४ तास ने दिलेल्या वृत्तानुसार राऊत यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. याबाबत भाष्य करताना राऊत म्हणाले,पारनेरच्या नगरसेवकांना परत करण्याची मागणी केली असेल तर मी तुम्हाला कशाला सांगू. पारनेरचा विषय लहान आहे, स्थानिक विषय आहे. त्या घटनेचा अजित पवारांचा तसा संबंध नाही. अजित पवार अंधारात होते. ही फोडाफोडी नाही, परंतु अशा प्रकारे एकमेकांच्या लोकांना प्रवेश देताना यापुढं चर्चा व्हायला हव्यात, असंही राऊत यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

