मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट बनली आहे. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ घरात बसून काम करीत असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून आधी खासदार नारायण राणे तर आता मनसेने देखील ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘या’ मालिकेतील कलाकाराला झाली कोरोनाची लागण; थांबवलं शूटिंग
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे ‘फक्त घरी बसून कामं होत नाहीत, त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात’,असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत्या संख्येला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकारने पुरेशी काळजी न घेतल्याने मुंबईने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनला मागे टाकले आहे. फक्त घरी बसून काम होत नाही, त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात, असा टोला देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, नुकतीच काहीशी अशीच टीका नारायण राणे यांनी देखील केली होती. महाविकासआघाडी सरकारला कोरोनाची परिस्थिती नियंत्रणास आणण्यात सपशेल अपयश आले असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निष्क्रियताच याला कारणीभूत आहे. निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम नसुन ते फक्त मातोश्री पुरतेच मर्यादित आहेत अशी राणे यांनी सोमवारी मुंबई येथे केली.
अखेर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
ते म्हणाले की, राज्यात कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यास त्यावर उपाययोजना शोधण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. करोनाच्या प्रश्नांवर मंत्र्यांच्या बैठका सुद्धा आयोजीत केल्या जात नाहीत. मुख्यमंत्री हे मातोश्रीच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्यामुळे मंत्रालय हे मुख्यमंत्री सांभाळत नसुन अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रशासन हाताळण्यास आणि निर्णय घेण्यास ते सक्षम नाहीत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

