Share

चंद्रकांत पाटलांनी केलेल्या भाकिताचं काय झालं? आज १० मार्च

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असं भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

महिना उलटला आणि १० मार्च ही तारीख देखील उजाडली. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून जाणार असल्याचे कुठलेच चिन्ह दिसत नाहीयेत. भाजपच्या इतर नेत्यांनी जसं आघाडी सरकार पडणार असल्याच्या तारखा जाहीर करत भाकीतं केली होती तसंच चंद्रकांत पटलांचं देखील हे भाकीत खोटं ठरलं आहे असं दिसत आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल सकाळ पासून जाहीर होताना दिसत आहेत. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तसेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने चांगलीच बाजी मारली आहे. आता या निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणात काही परिणाम होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!