Share

‘आरोप करण्यापूर्वी इतिहासात काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे’

Published On: 

सातारा : राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी राहुल यांना दिला आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी भारत-चीन वादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलेच शालजोडीतून लगावले आहेत.

जाणून घ्या खरंच भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल-डीझेल पाकिस्तानात मिळतंय का ?

पवार म्हणाले, काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२च्या युद्धानंतर चीनने आपला भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असं सांगतानाच जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये.

पवार म्हणाले, चीनसोबत युद्ध होणार नाही असे म्हणणे योग्य नाही. चीनने कुरापत काढली. सियाचिनच्या आपल्या भागात जाण्यासाठी हा रस्ता केलेला आहे. हा रस्ता भारतीयांसाठी आहे. असे असताना चीनचे सैन्य त्या रस्त्यावर येते. तेव्हा आपल्या जवानांनी त्यांना अडविले. झटापट झाली.

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

1993 साली संरक्षण मंत्री असताना चीनमध्ये गेलो होतो. तेव्हा हिमायलीन सीमेवर सैन्य़ कमी करण्याची चर्चा केली होती. नरसिंहराव यांनी चीनसोबत करार केला. यामध्ये दोन्ही बाजुने गोळीबार होणार नाही असा शब्द देण्यात आला. यामुळे चीनच्या बाजुने शारिरिक इजा करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जवान गस्त घालत होते, असे शरद पवार यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!