Share

गरिबी निर्मूलनाबाबत मोदींनी पोप यांना नक्की कोणती माहिती दिली? सामनातून सवाल

Published On: 

मुंबई: युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मौदी आणि पोप यांच्यात जगातील गरिबी निर्मूलन तसेच हवामान बदलावर चर्चा झाली.अमेरिका, युरोपातील अनेक ख्रिश्चन देशही आपल्या गरीब जनतेची चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. या राष्ट्रांना आर्थिक महासत्ता म्हटले जाते. मोदी आणि पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून केला आहे.

मोदी आणि पोप यांच्यात चर्चा सुरु असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱया मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातील 21 राज्यांत ‘मनरेगा’चे काम चालत असते. 2020-21 मध्ये 7.75 कोटी कुटुंबांना या योजनेंतर्गत काम आणि रोजगार मिळाला. आता ही योजनाच आर्थिक संकटात सापडल्याने भारतातील गरीबांवर मोठेच संकट कोसळले आहे. पोप आणि मोदी भेटीत गरिबी निर्मूलनावर चर्चा झाली म्हणून मनरेगाचा प्रश्न आम्ही येथे मांडला. असे सामनातून राऊत यांनी म्हटले आहे.

भारतातील शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी एक वर्षापासून लढत आहेत. त्या गरीब शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याचे अघोरी प्रयोग झाले. गरिबी निर्मूलनाच्या जागी गरीबांचेच निर्मूलन करावे, अशी ही योजना दिसते. महागाईच्या वणव्यात गरीब होरपळला आहे. भारताची लूट करून उद्योगपती, नोकरशहा परदेशात पळून जात आहेत. अशाने मोदींच्या देशात गरिबीचे निर्मूलन कसे होणार? पोप यांच्याही मनात हे सर्व प्रश्न असणारच आणि पोप यांच्याबरोबरच्या चर्चेत गरिबी निर्मूलनाबाबत मतप्रदर्शन झालेच असणार. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!