Share

काय म्हणता…! ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळविस्तार आणि संजय राऊत अनुपस्थित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुचर्चेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मुंबईच्या विधिमंडळ प्रांगणात हा शपतविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 36 मंत्र्यांना मंत्रीपदाची आणि गोपानियेतेची शपथ दिली. या शपथविधीला सोहळ्याला अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते. मात्र या सर्व मान्यवरांमध्ये खा. संजय राऊत कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे भाऊ आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे.

संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत हे विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. राऊत यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, यादीमध्ये त्यांचे नावच नसल्याने राऊत बंधू उद्धव ठाकरेंवर नाराज झाल्याचे दिसत आहे. तर एका वृत्तवाहिनीनुसार सुनिल राऊत हे आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

संजय राऊत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर म्हणाले की, एक चांगले आणि अनुभवी असलेलं मंत्रिमंडळ असून चांगलं काम करून राज्याला दिशा देईल. सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याने आमच्या घरातील कोणीही नाराज नाही. सरकार स्थापन करण्यात आम्हाला महत्वाची भूमिका निभावता आली. त्यातचं आम्ही समाधानी आहोत, असे राऊत म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!