टीम महाराष्ट्र देशा : ठरलेल्या वेळेत राज्यात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात ७ नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागेल, असे विधान भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केले होते. यावरून राजकीय वर्तुळातून सुधीर मुनंगटीवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी होत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही राऊत यांना मिश्कील टोला लगावला आहे.
मुनगंटीवार यांना राष्ट्रपतींचे अधिकार दिले आहेत काय, याची माहिती नाही, असा चिमटा पवारांनी काढला आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकाचं प्रचंड नुकसान झालं. नुकसानग्रस्त भागाची शरद पवार यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी माझी भेट घेतली हे खरं आहे. पण राजकारणाबाबत चर्चा झाली नाही. काँग्रेसचे नेते दिल्लीत जाऊन वरिष्ठांना भेटले याबाबतही माहिती नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलही मला कल्पना नाही.
सुधीर मुनगंटीवार यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, मुनगंटीवार यांना राष्ट्रपतींचे अधिकार दिले आहेत काय, याची माहिती नाही, असं सांगत टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190606665516634112?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190606346548236288?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190604378878566400?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

