मुंबई: सध्या देशभरात आणि राज्यात ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून राजकारण रंगताना दिसून येत आहे. काँग्रेसकडून या चित्रपटात सत्यता लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटात काळात-नकळत कॉंग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. तर आता भाजप नेते अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत टोला लगावला आहे.
“काँग्रेसने कळत नकळत केलेल्या मुस्लिम लांगूलचालनाच्या पापाचे ते वास्तव चित्रण आहे. तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं?”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. दरम्यान भाजपकडून हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसमुळे काश्मिरी जनतेला भोगावे लागणारे अन्याय, अत्याचार असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हटले जात आहे.
काँग्रेसने कळत नकळत केलेल्या मुस्लिम लांगूलचालनाच्या पापाचे ते वास्तव चित्रण आहे.
तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं? pic.twitter.com/H7NMh4RBS1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 21, 2022
शरद पवार नेमके काय म्हणाले?
काश्मिरमध्ये जे काही घडलं आणि जे सध्या दाखवले जात आहे त्यामध्ये फरक आहे. त्यावेळी देशाचे नेतृत्व हे काँग्रेसकडे नसून विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होते. भाजपच्या पाठबळामुळेच या कालावधीत मुफ्ती मोहमम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री झाले होते. तेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती. तसेच तेथील राज्यपालही काँग्रेसच्या विचारांचे नव्हते. तसेच समाजामध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करणे टाळायला हवे, असे शरद पवार यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘KGF Chapter 2’मधील रॉकी भाईची ‘तुफानी’ झलक पाहिलीत का? गाणंही झालंय…
- शाहरुख खानला भेटण्यासाठी कोलकाताचा कर्णधार श्रेयस उत्सुक; म्हणाला “मी वेडा होईल…”
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनसेतर्फे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!
- जन्मदिवस तिथी नुसार सांगा..! एक लाख देतो – जितेंद्र आव्हाड
- “सावित्री पुलाची दुर्घटना अजूनही ताजीच…”, सुनील तटकरेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

