Share

शाहरुख खानला भेटण्यासाठी कोलकाताचा कर्णधार श्रेयस उत्सुक; म्हणाला “मी वेडा होईल…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये, बॉलीवूड स्टार किंग खानची टीम कोलकाता नाइट रायडर्सने १२. २५ कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन श्रेयस अय्यरचा संघात समावेश केला. त्यानंतर फ्रँचायझीने श्रेयस अय्यरला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. केकेआरचा कर्णधार हा संघाचा मालक शाहरुख खानचा मोठा फॅन आहे. किंग खानला भेटल्यास त्याची प्रतिक्रिया काय असेल याची माहिती श्रेयस अय्यरने दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस अय्यरने (shreyas iyer) सांगितले की, “मी शाहरुखशी बोललो नाही. मी त्या क्षणाची खरोखरच आतुरतेने वाट पाहत आहे, तो विशेषतः माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. कारण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मला त्यांच्या मुलाखती पाहायला आवडतात. शाहरुख खान (shahrukh khan) जेव्हा-जेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असतो आणि ज्या पद्धतीने तो संघाला सपोर्ट करतो, ते कौतुकास्पद आहे. मी खरोखर उत्सुक आहे आणि फक्त त्याला भेटण्याची वाट पाहत आहे. जेव्हा मला त्याला भेटण्याची संधी मिळते तेव्हा मला वाटते की मी थोडा वेडा होईन.”

२०२१ मध्ये, इऑन मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र त्याच्या खराब फलंदाजीमुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तो १७ सामन्यांमध्ये १३३ धावा करू शकला. यामुळेच केकेआरने त्याला रिटेन किंवा खरेदी केले नाही. यानंतर मॉर्गन आयपीएल २०२२ च्या ऑक्शनमध्ये विकला गेला नाही. त्यामुळे फ्रँचायझीने टीम इंडियाचा उदयोन्मुख फलंदाज श्रेयस अय्यरला संघाची धुरा सोपवली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!