टीम महाराष्ट्र देशा : सरकारने दुष्काळासाठी कामं केली मग महाराष्ट्रातील 29 हजार गावं का दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला आहे. अमिर खान हे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात तेव्हा त्या कार्यक्रमांना राजकीय नेते हजेरी लावून अमिर खानचं कौतुक करतात, पण मग हे स्वत: काम का करत नाहीत?, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. त्यावेळी सरकारने दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला? दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केले? दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या? असे प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला केले.


