Share

लग्न झालेल्या मुख्यमंत्र्याने घरी बसून काय दिवे लावले? महाविकास आघाडीच्या टीकेवर भाजपा आमदाराने साधला निशाणा

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीच्या ट्विटर अकाऊंट वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “पुढचा प्रधानमंत्री लग्न झालेला असावा, कारण तो मन कि बात बायकोशी करेल आणि काम कि बात जनतेशी”, अशी जहरी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

या टीकेला कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. “लग्न झालेल्या मुख्यमंत्र्याने घरी बसून काय दिवे लावले ते जनता बघतेच आहे…” अशी खरमरीत टीका करत त्यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले आहे.

पुढचा पंतप्रधान लग्न झालेला असावा; महाविकास आघाडीचा पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

दरम्यान, कोरोना, दूध दरवाढ, निसर्ग चक्रीवादळ मदत, शेतकऱ्यांचे इतर प्रश्न यावरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आता, सर्व आलबेल असल्याचे जरी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगितले जात असले तरी काँग्रेस नेत्यांची नाराजी, कालच राष्ट्रवादी कडून परभणीमध्ये गळचेपी होत असल्याचे कारण देत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी खासदारकीचा दिलेला राजीनामा यांवरून अंर्तगत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

गेल्या २४ तासांत देशातील नव्या कोरोना बाधितांचा उच्चांक! तर आतापर्यंत ६० हजारहुन अधिक मृत्यू

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!